Last Updated: Wednesday, February 8, 2012, 23:27
www.24taas.com, नालासोपारा 
नालासोपाऱ्यात एकतर्फी प्रेमातून दीपक गुरव या तरुणानं तरुणीवर चाकूनं हल्ला केला. यात ती तरुणी जखमी झाली असून ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेते आहे. प्रियकराने आपल्या मैत्रीणीला धमकी दिली होती. मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराने आपल्या मैत्रीणीवर धारधार चाकूने एक दोन नव्हेतर चक्क पाच वार केले.
दिपक आणि पीडित तरुणी हे गेल्या सात वर्षापासून मित्र होते. पण दिपक हळूहळू या तरुणीवर प्रेम करू लागला. तिच्या सोबत पुढच्या आयुष्याचे स्वप्न बघू लागला. तिच्या सोबत लग्न करण्याची इच्छा कित्येकदा दिपकने व्यक्त केली होती पण तरुणीसाठी दिपक फक्त मित्र होता. ही तरूणी लग्नाला वारंवार नकार करत असल्यामुळे पिसाळलेल्या दिपकने भर रस्त्यावर गर्दीत तिच्या चेहऱ्यावर धारधार चाकूने वार केला.
मुलीवर वार करून आरोपी दिपक पळण्याचा तयारीत होता. पण जमावाने त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलं. त्या पिडीत तरुणीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या दिपकला अटक केली आहे. पण व्हॅलेंटाईन डे च्या ठीक आधी झालेल्या या प्रकरणाने प्रेमी युगलांचा मनात भिती निर्माण केली आहे.
First Published: Wednesday, February 8, 2012, 23:27