एकतर्फी प्रेम अन् 'ती'च्यावर ब्लेडनं वार

Last Updated: Tuesday, January 1, 2013, 19:39

अवघा देश नव्या वर्षांच्या स्वागतासाठी सज्ज असताना ठाण्यामध्ये पुन्हा एका मुलीला पुरुषी अहंकाराला बळी पडावं लागलंय. एका माथेफिरु तरुणानं तरुणीवर ब्लेडने वार केल्याची घटना ठाणे स्टेशनवर घडलीय.

पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याचे वार

Last Updated: Wednesday, December 12, 2012, 18:34

पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणा-या युवतीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्यानं पुण्यात खळबळ उडाली आहे. अनमोल जाधवराव या तरुणानं तरुणीवर कोयत्यानं हल्ला केला. जखमी युवतीला उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अनमोल जाधवरावला अटक केलीय.

तरुणीवर अॅसिड हल्ला; पुन्हा थरारली मुंबई!

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 16:55

आज पुन्हा एकदा मुंबईत एका तरुणीवर अॅसिड हल्ला झालाय. कांदिवलीतल्या समतानगर भागात ही घटना घडलीय. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचं पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट झालंय.

दिला प्रेमाला नकार, झाले पाच वार

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 23:27

नालासोपाऱ्यात एकतर्फी प्रेमातून दीपक गुरव या तरुणानं तरुणीवर चाकूनं हल्ला केला. यात ती तरुणी जखमी झाली असून ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेते आहे. प्रियकराने आपल्या मैत्रीणीला धमकी दिली होती. मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराने आपल्या मैत्रीणीवर धारधार चाकूने एक दोन नव्हेतर चक्क पाच वार केले.