'एक्सप्रेस'वरील अपघातात ४ ठार - Marathi News 24taas.com

'एक्सप्रेस'वरील अपघातात ४ ठार

www.24taas.com, नवी मुंबई
 
 
पनवेल नजीक एक्सप्रेस हायवेवरील आसूड गावाजवळ एक ट्रक आणि झायलो कार अपघातात नवीमुंबईतील लोखंडे कुटुंबातील चार जण ठार तर सहा जण जखमी झालेत. हा अपघात आज शनिवारी झाला. जखमींना पनवलेमधील एका हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
 
सोलापूरहून यात्रा करून खारघरला परत चाललेल्या लोखंडे कुटुंबियांच्या झायलो गाडीची शेजारून चाललेल्या ट्रकशी जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की गाडीतील चार प्रवासी जागीच ठार झाले. अनिल लोखंडे (३०), सुजाता अनिल लोखंडे (२८), अभिषेक सुनील लोखंडे (३) , राणी सुनील लोखंडे (२५) अशी मृतांची नावे आहेत.
 
 
जखमींपैकी लतिका लोखंडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पनवेलमधील  एका हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुनील लोखंडे, गायत्री लोखंडे, प्रगती लोखंडे आणि गौरी लोखंडे अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर जवळच्याच रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी सुनील लोखंडे यांनी ट्रकचालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

First Published: Saturday, February 18, 2012, 17:23


comments powered by Disqus