Last Updated: Sunday, November 6, 2011, 06:48
झी २४ तास वेब टीम, कल्याणमुलींना फसवणा-या एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. कुठलाही आजार बरा करून देतो, असं सांगून हा भोंदूबाबा मुली आणि महिलांना त्याच्या घरी बोलवायचा आणि त्यांच्यावर बलात्कार करायचा. मांत्रिक असल्याचं सांगणा-या या चोवीस वर्षाच्या इमामुद्दीन ठाकूरला पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी कल्याणमधली एक तरुणी या भोंदूबाबाच्या भुलथापांना बळी पडली होती. तिने याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या बाबाला बेड्या ठोकल्यात.एका १९ वर्षांच्या मुलीवर या बाबाने बलात्कार केला. तसंच याबाबत कुणालाही सांगू नको, अशी धमकीही दिली.
पोलिसांत तक्रार दिल्यानंतर याचा सुगावा लागताच या भोंदू बाबाचा परदेशात पळून जाण्याचा बेत होता, मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
First Published: Sunday, November 6, 2011, 06:48