Last Updated: Saturday, February 25, 2012, 12:21
www.24taas.com, रायगड महाडजवळील बिरवाडी येथे सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात १४ वर्षीय मुलगी ठार झाली. या हल्ल्यात चार जण जखमी झालेत.
रायगड जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून दरोड्यांचे सत्र चालू आहे. रायगडमध्ये महाडजवळील बिरवाडीत सुतार यांच्या घरावर पहाटे चारच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. हा हल्ला इतका धाडशी होता की, दरोडेखोरांच्या हल्ल्यात १४ वर्षांची मुलगी शिवानी हिची निघृण हत्या करण्यात आली. तर प्रतिकार करणारे अन्य चार जण गंभीर जखमी झालेत. गेल्या दोन महिन्यांतील ही 10वी घटना आहे. दरम्यान घरातील एकूण किती ऐवज चोरीला गेला आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
First Published: Saturday, February 25, 2012, 12:21