Last Updated: Saturday, February 25, 2012, 20:37
www.24taas.com, अंबरनाथ 
अंबरनाथमध्ये रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री एका महिला टीसीनं दारू पिऊन चांगलाच हंगामा केली. ड्युटी संपल्यानंतर राधा तोमर ही महिला टीसी मित्राबरोबर प्रवास करत होती. महिलांच्या डब्यात एका महिलेकडे तिने तिकीटाची विचारणा केली. त्या महिलेकडे तिकीट नसल्यानं मद्यधुंद राधा तोमरनं तिला मारहाण करायला सुरूवात केली.
या घटनेनंतर इतर प्रवाशांनी तिला जाब विचारल्यावर तिनं सगळ्यांबरोबरच हुज्जत घातली. अखेर आरपीएफच्या जवानांना पाचारण करावं लागलं. प्रवाशांनी राधा तोमरच्या विरोधात तक्रार दाखल केली. यावेळीही राधा तोमरचा तोरा कायमच होता.
प्रवाशांच्या गर्दीपुढेही राधा तोमरची दारू काही उतरत नव्हती. अखेर तिला कल्याणला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं. मात्र कल्याणला जातानाही राधा तोमर यांचा तोरा कायम होता. एखाद्या विजयी वीराप्रमाणं त्यांनी प्रवाशांना टाटा करत कल्याणच्या दिशेनं प्रयाण केलं.
First Published: Saturday, February 25, 2012, 20:37