मीरा रोड भागात रिक्षाचालकांचा संप - Marathi News 24taas.com

मीरा रोड भागात रिक्षाचालकांचा संप


www.24taas.com, ठाणे
 
मुंबईच्या मीरा रोड भागात मुजोर रिक्षाचालकांनी अचानक बंद पुकारला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. आरटीओनं ठरवलेल्या नवीन दरपत्रकाविरोधात रिक्षाचालकांनी बंदची हाक दिली.
 
आरटीओचं हे दरपत्रक मान्य नसल्याचं सांगत अचानक कोणतीही पूर्व कल्पना न देता रिक्षा चालकांनी मनमानी करत हा बंद पुकारला. अचानक झालेल्या या प्रकारानं चाकरमान्यांचे हाल झाले. सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना पायपीट करत मीरारोड स्टेशन गाठावं लागलं.
 
सीएनजीचे दरही तीन रुपयांनी वाढल्यामुळे आरटीओनं दिलेलं दरपत्रक मान्य नसल्याचं कारण रिक्षाचालकांनी पुढे केलंय. तसंच आरटीओनं दर वाढवल्यानंतर रिक्षा चालकांना विश्वासात न घेता महापालिकेच्या माध्यमातून परिसरात सर्वत्र रिक्षाचे विविध मार्गांचे दरपत्रक लावल्यानं रिक्षा चालकांमध्ये आणखी संतापाची भर पडली आहे. आरटीओनं कुठल्याही प्रकारचा सर्वे न करता दर वाढवल्याचं रिक्षाचालकांचं म्हणणं आहे.
 

First Published: Wednesday, February 29, 2012, 14:18


comments powered by Disqus