नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्स - Marathi News 24taas.com

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्स

www.24taas.com,  नवी मुंबई
 
 
विमानतळ आणि मेट्रो प्रकल्पासोबतच सिडकोनं नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचं गोल्फ कोर्स उभारलंय. खारघरमधील पांडवकडा धबधबा परिसरातील १०३ हेक्टर जागेत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
 
 
१८ होल्सच्या या गोल्फ कोर्सपैकी ११होल्स पूर्ण झाले असून लवकरच या गोल्फ कोर्सचं उद्घाटन होणार आहे.   नवी मुंबईतला आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोल्फकोर्स. खारघरच्या पांडवकडा धबधबा परिसरात १०३ हेक्टर जागेत साकारलेला हा प्रकल्प उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. ५० कोटींची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प बांधताना इथले नैसर्गिक चढउतार तसेच ठेवण्यात आले आहेत.
 
 
हे गोल्फ कोर्स ऑस्ट्रेलियन गोल्फ तज्ज्ञांकडून डिझाईन करण्यात आलंय. वॉटरबॉडी आणि बंकरसाठी अत्यावश्यक जागा अत्याधुनिक पद्धतीनं तयार करण्यात आल्या आहेत. एकूण १८ होल्सच्या असणा-या या प्रकल्पातले ११ होल्स पूर्ण झालेत. उरलेल्या ७ होल्स वनविभागाच्या अखत्यारित येत असल्यानं वनविभागाची परवानगी  मिळण्यासाठी सिडको प्रतिक्षेत आहे.
 
व्हिडिओ  पाहा..
 

First Published: Thursday, March 1, 2012, 10:02


comments powered by Disqus