भाज्यांचे भाव कडाडले - Marathi News 24taas.com

भाज्यांचे भाव कडाडले

स्वाती नाईक, www.24taas.com, नवी मुंबई
 
उन्हाळ्याची चाहूल लागताच भाज्यांचे भाव कडाडले आहेत. गवार, काकडी तर तब्बल ८० रुपये किलो झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे.
 
अचानक वाढलेली थंडी आणि उन्हाचा वाढलेला पारा यामुळं नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळं साहजिकच भाज्यांचे भाव वाढले आहेत. गवार आणि काकडी तब्बल ८० रुपये किलो तर भेंडीचा दर ६० रुपये झालाय.  फरसबी ६० रुपये, तर मटार ४० रुपये किलो झाली आहे. असंच वातावरण राहीलं तर आणखी भाववाढ होण्याची शक्यता आहे.
 
ठोक बाजारात भाववाढ झाल्यानं किरकोळ बाजारात तर भाव गगनाला भिडले आहेत. भाज्या एवढ्या महागल्यानं खायचं काय असा प्रश्न ग्राहकांना पडलाय. आणखी काही दिवस तरी भाज्यांचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.

First Published: Saturday, March 3, 2012, 18:20


comments powered by Disqus