अबब.. ही केवढी 'माया ज्योतिषींची'... - Marathi News 24taas.com

अबब.. ही केवढी 'माया ज्योतिषींची'...

www.24taas.com, ठाणे
 
पनवेलजवळ चिखले गावातील श्री रामानुग्रह ट्रस्ट सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण या ट्रस्टशी संबंधित दोन कर्मचाऱ्यांना १ करोड रुपयांसह अटक करण्यात आली आहे. ज्योतिष आनंद नायर या ट्रस्टचे संस्थापक आहेत.
 
पनवेलजवळच्या चिखले गावात श्री रामानुग्रह ट्रस्टचा आश्रम तयार होत आहे. वास्तुशास्त्रज्ञ आणि ज्योतिष म्हणून ओळखले जाणारे आनंद नायर हे या आश्रमशाळेचे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्याच सेवेत असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जयपूर विमानतळावर १ कोटी रुपयांसह पकडल्याने खळबळ उडाली आहे. ट्रस्टतर्फे मात्र याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगण्यात येतं आहे.
 
पनवेलमध्येही श्री इंदिरा क्षेत्रम या नावानं आणखी एका नवीन आश्रमाचं बांधकाम सुरू आहे. तर आनंद नायर यांचेच कानपूर, रामबाला श्रीरामपूर इथंही आश्रम आहेत. आयकर विभागानं कर्मचाऱ्यांना पकडल्यामुळे या ट्रस्टकडे एवढा पैसा आला कुठुन याचा तपास आयकर विभागाकडून आता सुरू आहे.
 
 
 
 
 
 

First Published: Sunday, March 4, 2012, 20:26


comments powered by Disqus