चवदार तळे सत्याग्रह ८५ वर्ष पूर्ण - Marathi News 24taas.com

चवदार तळे सत्याग्रह ८५ वर्ष पूर्ण

www.24taas.com, महाड
 
महाडचे चवदार तळे अजरामर झाले ते डॉ. बाबासाहेब यांनी केलेल्या सत्याग्रहामुळे. महाडच्या चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रहाला आज ८५ वर्षे पूर्ण होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्याच दिवशी १९२७ साली चवदार तळे सत्याग्रह केला आणि तळ्याचे पाणी सर्व मानवजातीसाठी खुलं झालं.
 
या ऐतिहासिक घटनेला आज ८५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या ऐतिहासिक दिवसासाठी चवदार तळ्याला भेट देण्यासाठी संपूर्ण देशातील डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी उपस्थित राहणार आहेत.
 
तसंच आरपीआय नेते रामदास आठवले, भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य दलित नेते उपस्थित राहणार आहेत. सर्व प्रमुख दलित नेते मंडळी याठिकाणी उपस्थित राहणार असले तरी वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहेत. आज चवदार तळ्याच्या क्रांतीपर्वाला ८५ वर्ष झाली असले तरी दलित नेते अजूनही विभक्तच असल्याचं चित्र दिसून येते आहे.
 
 
 
 

First Published: Tuesday, March 20, 2012, 08:06


comments powered by Disqus