Last Updated: Tuesday, March 20, 2012, 08:23
www.24taas.com, पनवेल 
पनवेलमध्ये एका जोडप्याच्या पाच वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधाचे लग्नात रुपांतर होणार होतं. परंतू पैशाच्या वादातून दुखावलेल्या तरुणीनं स्वत:च्याच लग्नाच्या दिवशी गळफास लावून आत्महत्या केली आहे.
पनवेलमध्ये राहणारे सचिन आणि नीलेखा लवकरच लग्न करणार होते. गेल्या पाच वर्षांपासून असणाऱ्या प्रेमसंबंधांचे लग्नात रुपांतर होणार होते. लग्नाची तयारीही पूर्ण झाली होती. परंतू अचानक सचिनला लग्नाचं भाडं भरण्यास सांगितल्यानं संतप्त झालेल्या सचिननं हळदीच्या दिवशी हॉलची भाडं भरलेली पावती नीलेखाच्या अंगावर फेकली आणि आपण पैसे देणाऱ्या मुलीबरोबर लग्न करू असं सांगत भांडणही केलं.
मात्र दुखावलेल्या नीलेखानं नंतर लग्नाच्या दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नीलेखाच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात सचिनविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सचिनला ताब्यात घेतलं आहे. मात्र, या भांडणात नीलेखानं मात्र आपला जीव गमावला हे खरं.
First Published: Tuesday, March 20, 2012, 08:23