Last Updated: Friday, March 30, 2012, 16:35
www.24taas.com, अलिबाग समुद्राचे संतुलन बिघडले की पाणी प्रदूषित झाले?..जागतिक वातावरणाचा काय झाला आहे परिणाम....आदींबाबत चर्चा झडत असताना रायगडच्या सुमद्र किना-यावर ग्रीन टर्टर या दुर्मिळ जातीची प्रचंड मोडी कासवं मृतावस्थेत सापडत आहेत. त्यामुळे चर्चेला अधिकच जोर आला आहे. निसर्गप्रेमी रत्नागिरीतील मंडणगड आणि रायगडमध्ये कासव संर्वधनाचे काम करीत आहेत, हाच काय तो दिलासा देणारा प्रयत्न आहे.
गेल्या आठवडाभरापासून अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन आणि दिवेआगर समुद्र किना-यावर मोठी कासवं आणि 30 फूटांहून अधिक लांबी असलेले मोठे मासे मृतावस्थेत आढळले आहेत. रायगडमध्ये जेटी बंदराचं काम सुरू आहे. त्याच्या कामासाठी जहाजांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू आहे. या जहाजांमुळेचं अपघात होऊन सागरी जिवांना धोका पोहचत असल्याचं बोललं जात आहे.

रायगडची समुद्र किनारपट्टी ही पर्यटकांना आकर्षित करीत आहे. कारण ती पर्यटकांसाठी सुरक्षित आहे. मात्र, हा सागरी किनारा आता धोकादायक ठरत आहे. सागरसंपत्तीसाठई ही बाब धोक्याची सूचना देत आहे. कारण या किनाऱ्यावर माशांबरोबरच आता कासवं ही मृताअवस्थेत सापडत आहेत. त्यामुळे निसर्गप्रेमीनी धोक्याचा इशारा दिला आहे. या कारणांची उकल करण्याचा प्रयत्न केला नाही तर समुद्र संपतीवर संकट ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे संशोधनाची गरज आहे.
व्हिडिओ पाहा...
First Published: Friday, March 30, 2012, 16:35