Last Updated: Friday, November 18, 2011, 07:42
झी २४ तास वेब टीम, ठाणे 
ठाण्याच्या येउर गावात रहाणाऱ्या १२ वर्षीय सुरज सोले यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं संपुर्ण परीसरात खळबळ उडाली आहे. अभ्यासासाठी आई ओरडल्यानं सुरजला राग आला आणि याच रागाच्या भरात सातवीत शिकणाऱ्या सुरजनं हे पाऊल उचललं असावं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ठाण्याचे वर्तकनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलांमध्ये आमहत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कारण की अभ्यासाचा वाढता ताण मुलांना सहन होत नाही. आणि यातूनच अशा घटना घडतात. यासाठी पालकांचे आपल्या पाल्यांशी सुसंवाद असणं अत्यंत गरजेचे आहे.
First Published: Friday, November 18, 2011, 07:42