वाळूमाफिया नितीन परबला अखेर अटक - Marathi News 24taas.com

वाळूमाफिया नितीन परबला अखेर अटक

www.24taas.com, खालापूर
 
रायगड जिल्ह्यातल्या रोह्याचा वाळूमाफिया नितीन परबला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पुणे रोडवर खालापूर जवळ त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तूल आणि गाडी जप्त करण्यात आली आहे.
 
वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांवर पिस्तूल रोखल्याचा परबवर आरोप आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यानं कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टानं त्याचा जामीन फेटाळल्यानंतर दोन दिवसांपासून परब फरार होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही त्याला रोहा शहराध्यक्षपदावरुन निलंबित केलं होतं. राजकीय लागेबांधे असल्यामुळेच त्याला अटक केली जात नाही असा आरोप विरोधकांनी केला होता. पोलिसांवर चौफेर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी सूत्र हलवत परबला अटक केली.
 
रायगड जिल्ह्यातल्या रोह्याचा वाळूमाफिया नितीन परब गेल्या दोन दिवसांपासून फरार होता. परब याचा जामीनअर्ज माणगावच्या कोर्टानं फेटाळल्यानंतर त्यानं शरण येणं अपेक्षित होतं. मात्र तसं न करता नितीन परब फरार झाला होता. अखेर, खालापूरजवळ नितीन परबला अटक करण्यात आलं आहे.

First Published: Thursday, April 5, 2012, 09:09


comments powered by Disqus