राष्ट्रवादीचा ठाण्यात आघाडी धर्म? - Marathi News 24taas.com

राष्ट्रवादीचा ठाण्यात आघाडी धर्म?

www.24taas.com, ठाणे
 
 
ठाणे महापालिकेत काँग्रेसप्रणित आघाडीला मान्यतेचा वाद कोर्टात गेला आहे. तर आघाडीचा धर्म आपण कसा पाळतो हे दाखवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. केडीएमच्या स्थायी समितीच्या निवडीत काँग्रेसला साथ न देणा-या राष्ट्रवादीच्या दोघा नगरसेवकांवर कारवाईचा निर्णय पक्षानं घेतला आहे.
 
 
 
ठाण्यातल्या सत्ता संघर्ष संपण्याची चिन्हे नाहीत. ठाण्यात स्वतंत्रपणे नोंदणी करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरु असतानाच भाजपनंही राष्ट्रवादीला या प्रकरणी शह द्यायचा प्रयत्न चालवलाय. आघाडीने 65 जणांची एकत्र बैठक न घेता गटनेता कसा निवडला असा सवाल भाजपनं केलाय.  दुसरीकडं राष्ट्रवादीने मात्र आम्ही आघाडीचा धर्म कसा पाळतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
 
केडीएमसीच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी पडद्यामागच्या राजकाऱणातून तिजोरीच्या किल्ल्या शिवसेनेकडं राहील्या. अध्यक्षपदाच्या निवडीत माघार घेऊन काँग्रेसला मदत न करणा-राष्ट्रवादीच्या दोघा नगरसेवकांवर कारवाईचा पवित्रा घेत राष्ट्रवादीने सावरासावरीचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला धोबीपछाड दिली. आता काँग्रेस त्याच उट्टं काढण्याचा प्रयत्न करतय. त्यातून शह-काटशहाचं राजकारण जोरात सुरु आहे.
 

First Published: Friday, April 6, 2012, 21:52


comments powered by Disqus