Last Updated: Saturday, April 7, 2012, 18:59
www.24taas.com, अलिबाग रायगड जिल्ह्यातील दिवेआगर इथल्या सुवर्ण गणेश मंदिरावर पडलेल्या दरोड्याला पंधरवडा उलटूनही पोलीस तपासात काहीच धागेदोरे न लागल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दिघीसागरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
दिवेआगर इथल्या सर्वपक्षीय ग्रामस्थांनी एकत्र येत हा विराट मोर्चा काढला. मोर्च्यामध्ये गावातील शेकडो महिलाही सहभागी झाल्या होत्या. पोलीस ठाण्यावर मोर्चा गेल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन करत पोलीस तपासातील प्रगतीबद्दल माहिती दिली. पोलिसांनी तपासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.
आणखी संबंधित बातम्या 
गणेशमूर्ती चोरी : ट्रस्टीच जबाबदार – गृहमंत्रीरायगड जिह्यातील दिवेआगारमधील सुवर्णगणेशमूर्तीच्या चोरीप्रकरणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मंदिराच्या ट्रस्टीवर टीकास्त्र सोडल आहे. मूर्तीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ट्रस्टींवर होती. मात्र ट्रस्टींनी सुरक्षेच्या नियमांचं पालन केलं नाही, अस सांगत आर.आर. पाटील यांनी ट्रस्टींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

सेनेने मूर्ती आणायला नको होती- मनसेशिवसेना-भाजप आमदारांनी विधानसभेत गणपतीच मूर्ती आणायला नको होती. असं वक्तव्य मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी केलीय. राज्य सरकारनं सत्तेचा दुरुपयोग केला असून निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले तर आम्ही त्यांना मदत करु असेही ते म्हणाले.
.
—————————————————
युतीचे १४ आमदार वर्षभरासाठी निलंबितरागयड जिल्ह्यातील दिवेआगर गणेश चोरीचा तपास लागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या युतीच्या १४ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे १३ तर भाजपचा १ आमदार एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
दिवेआगर चोरी: विधानसभेत सेनेचा गोंधळरायगडमधील दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरातून सोन्याची दीड किलोवजनाची मूर्तीची चोरी झाली. मात्र, या चोरीचा छडा लागलेला नाही. त्यामुळे शिवसनेने रायगड बंदची हाक दिल्यानंतर राज्यात घंटानाद आंदोलन केले. आज विधानसभा परिसरात आरती करून अधिक आक्रमकपणी स्वीकारला. चोरीचा तपास लावण्यास सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप करीत विधानसभेत गोंधळ घातला. त्यामुळे अर्धातास कामकाज तहकूब करावे लागले.

शिवसेनेचा रायगड बंदशिवसेनेनं आज रायगड बंदची हाक दिली आहे. दिवे आगार येथील सुवर्ण गणेश मूर्ती चोरी प्रकरणी शिवसेनेनं पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात प्रतिसाद मिळतो आहे. पहाटेपासूनच रिक्षा, मालवाहतूक बंद आहेत. अनेक ठिकाणी बाजारपेठाही बंद आहेत.
रायगडात सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडारायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगरमध्ये सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा टाकण्यात आला आहे. पेशवेकाळीन मंदिरातून दरोडेखोरांनी दीड किलो वजनाची सोन्याची मूर्ती पळवलीय. दोन वॉचमनला मारहाण करून हा दरोडा घालण्यात आला.
रायगड जिल्हयात दरोड्याचे सत्र सुरुचरायगडमध्ये दरोड्यांचं सुरूच आहे. पोलादपूर तालुक्यातील लोहारमल इथं एका दाम्पत्यावर दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली आहे. गेल्या सहा महिन्यातली ही 12 वी घटना आहे.
First Published: Saturday, April 7, 2012, 18:59