Last Updated: Tuesday, April 10, 2012, 13:21
www.24taas.com, भिवंडी भिंवडीजवळील आनगाव भागातल्या नदीत पाच जणांचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातल्या पाच जणांचे हे मृतदेह आहेत. दरम्यान, हा घातपात आहे की अपघात याची पोलीस चौकशी करीत आहेत. मात्र, एकाचवेळी पाच मृतहेह सापल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चार मुलांसह एका महिलेचा मृतदेह सापडला. कामताबाई (३७) , दीपाली (१३), मयुरी (९), सागर (११) आणि साहील (७) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. कामताबाई ही महिला काल नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. त्यावेळी पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला असण्याची शक्यता सुरूवातीला वर्तवली जात होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
ग्रामस्थांना भिवंडीजवळील नदीत पाच मृतदेह दिसल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटास्थळी पाहणी केली असून नदीतून पाचही मृतदेह बाहेर काढले आहेत. याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे या अपघातामागे घातपाताची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. याप्रकणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कामताबाई कुटुंबाची पार्श्वभूमी चांगली होती. त्यामुळे या घटनेकडे संशयाने पाहिले जात आहे.
First Published: Tuesday, April 10, 2012, 13:21