दिवेआगर चोरी : गुजरातमधून प्रमुखाला अटक - Marathi News 24taas.com

दिवेआगर चोरी : गुजरातमधून प्रमुखाला अटक


www.24taas.com, अलिबाग
 
 
दिवेआगारमधील सुवर्ण गणेश मूर्ती चोरीप्रकरणी गुजरातमधून मुख्य संशयिताला रायगड पोलिसांनी ताब्यात घेतलय. याशिवाय औरंगाबादमध्येही सात जणांची चौकशी सुरू आहे. हे सातही जण फासेपारधी आहेत.
 
 
गेल्या महिन्यात रायगडमधील दिवेआगर येथे सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा पडून दीड किलो वजनाची सोन्याची मूर्ती आणि दागिने चोरीला गेले होते. दोन पहारेक-यांचाही या घटनेत मृत्यू झाला होता. या चोरीवरून बरेच वातावरण तापले होते. शिवसेने रायगड बंद केला होता. तसेच चोरांना पकडण्यास उशीर झाल्याने विधानसभा परिसरात आंदोलनही केले होते.
 
 
संपूर्ण राज्यासह शेजारच्या राज्यात पोलिसांनी शोध मोहीम राबवली आहे. त्यात उत्तर गुजरातमधून मुख्य संशयिताला रायगड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याशिवाय औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातूनही काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
 
 
व्हिडिओ पाहा...
 

First Published: Saturday, April 21, 2012, 10:06


comments powered by Disqus