मुंब्रा बायपास, झोपडपट्टीवासियांना अपघातांचा त्रास - Marathi News 24taas.com

मुंब्रा बायपास, झोपडपट्टीवासियांना अपघातांचा त्रास

www.24taas.com,ठाणे
 
ठाण्यातील मुंब्रा येथील बायपासवर आज सकाळी झालेल्या एका विचित्र अपघातात वाहनचालक जखमी झाला आहे. मात्र या घटनेनंतर बायपासजवळील झोपडपट्टीवासियांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. बायपासच्या शेजारी संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केलीय.
 
७ वर्षांपूर्वी मुंब्रा येथील वाहतूक कोंडी सुटावी याकरिता मुंब्रा बायपास नावाचा नवीन पूल तयार बांधण्यात आला. परंतु या पुलामुळं शेजारच्या झोपडपट्टीत राहणा-या नागरिकांचा जीव धोक्यात आलाय. आज सकाळी नागपूर येथे जाणाऱ्या एका ट्रक चालकानं  बाईकस्वाराला  वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक बायपासवरून खाली कोसळला.
 
परंतु झोपड्यांमध्ये कोणी नसल्यानं जीवीतहानी झाली नाही. पावसाळ्यात अशा घटनांमध्ये वाढ होते. त्यामुळं टोलवसूल करणाऱ्या कंपनीला जाग आली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय.

First Published: Thursday, May 3, 2012, 18:06


comments powered by Disqus