Last Updated: Saturday, May 5, 2012, 12:33
www.24taas.com, श्रीवर्धन रायगड जिल्ह्यातील दिवेआगरच्या सुवर्णगणेश मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीये. चोरटे पर्यटक म्हणून आले आणि चोरी करुन गेले अशी माहिती समोर येत आली आहे.
चोरट्यांनी चोरीच्या आदल्या दिवशी सकाळी दिवेआगरात दर्शनाच्या बहाण्यानं मंदिराची रेकी केली. त्यानंतर चोरटे दिवसभर दिवेआगरमध्ये फिरले. मौजमजा केली. आणि मध्यरात्रीनंतर त्यांनी चोरी केली. तत्पूर्वी त्यांनी दिवेआगरातल्या एका हॉटेलमध्ये जेवणाची चौकशी केली. या हॉटेलमधील सीसीटीव्हीत चोरटे कैद झालेत. झी 24 तासच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे.
व्हिडिओ पाहा...
First Published: Saturday, May 5, 2012, 12:33