Last Updated: Monday, November 28, 2011, 13:23
झी २४ तास वेब टीम, सिंधूदुर्ग
सिंधूदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, वैभववाडी आणि विजयदुर्ग भागात रविवारी पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान खात्यानं चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं सिंधूदुर्ग जिल्ह्यात काही भागांमध्ये पाऊस झाला. काही भागांत जोरदार वारामुळं झाडांचं थोडफार नुकसानंही झालं. वाऱ्यामुळं विजपुरवठाही खंडीत झाला होता. या पावसामुळे हापूस आंब्याच्या मोहोरावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते, त्यामुळं आंबा उत्पादक शेतकरी धास्तावलेतसिंधूदुर्गात किनारपट्टीत वादळाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे त्यामुळे येथील स्थानिक मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
First Published: Monday, November 28, 2011, 13:23