Last Updated: Tuesday, November 29, 2011, 12:00
झी २४ तास वेब टीम, डोंबिवली मागील आठवड्यात मुंबईत स्कूल बसमधून डोकं बाहेर काढलेल्या मुलाला आपला जीव गमावावा लागला होता. तर काल पिकनिकला गेलेल्या डोंबिवलितल्या एका विद्यार्थ्यावर हात गमावण्याची वेळ आली. भरधाव वेगानं जाणारी पिकनिकची बस एका ट्रकला घासली आणि त्याच दरम्यान विद्यार्थ्यांने बाहेर काढलेला हात त्याला कायमचा गमवावा लागला.
डोंबिवलीच्या एस.के.बोस शाळेची पिकनिक शांग्रीला रिसॉर्टला जात होती. त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली. अकरावीत शिकणाऱ्या शब्बीर शेख या विद्यार्थ्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शाळा प्रशासनाचा निष्काळजीपणा यानिमित्तानं पुन्हा एकदा समोर आलाय. तसंच पिकनिकदरम्यान मुलांनी काळजी घेणंही गरजेचं आहे.
First Published: Tuesday, November 29, 2011, 12:00