एका इमारतीखाली उदध्वस्त झालेल्या या कहाण्या... , thane building collapse case studies

एका इमारतीखाली उदध्वस्त झालेल्या या कहाण्या...

एका इमारतीखाली उदध्वस्त झालेल्या या कहाण्या...
www.24taas.com, ठाणे

एक अनधिकृत बिल्डिंग कोसळते आणि त्याखाली दबून उद्वस्त होतात या ठिकाणी राहणाऱ्या अनेक कहाण्या... शिळफाट्याजवळील इमारत दुर्घटनेला आता १८ पेक्षा जास्त तास उलटून गेलेत. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता ४१ वर गेलाय तर ६० जण जखमी आहेत. त्यापैंकी १२ जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती मिळतेय.

दुर्घटनेला १८ तास उलटल्यानंतर

 बिल्डिंग कोसळल्यानंतर तब्ब्ल १८ तासांनी एका चिमुरडीला सुखरुप बाहेर काढण्यात आलंय. एवढ्या वेळ ढिगाऱ्याखाली अडकल्यानंतरही बचावलेल्या या मुलीला पाहून अनेकांचे डोळे भरून आले. पण, या चिमुरडीच्या कुटुंबीयांना शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न अदयापही सुरू आहे.

 अवघ्या काही महिन्यांपूर्वी नव्या घरात आलेल्या शमा सय्यद यांच्या कुटुंबातले ६ ते ७ जण अद्याप ढिगा-याखाली अडकलेत. त्या अगतिकपणे त्यांची वाट बघतायत. त्यांचे कुटुंबीय सुखरुप बाहेर येतील, अशी भाबडी आशा बाळगून त्या अजूनही घटनास्थळीच त्यांची वाट पाहत आहेत.

 अशीच मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेल्या आणखी एका मुलीला सध्या दिसत मात्र नाहीय. ढिगाऱ्याखाली दबलेल्या या मुलीच्या डोळ्यांत माती गेल्यानं तिला सध्या डोळेच उघडता येत नाहीयेत. आपले डोळे कधी उघडतील आणि आपल्या आई-वडीलांना पाहू शकू, यासाठी तिचे प्रयत्न सूरू आहेत.

First Published: Friday, April 5, 2013, 15:02


comments powered by Disqus