Last Updated: Sunday, March 17, 2013, 00:08
www.24taas.com, ठाणेहोर्डिंग काढण्याबाबत कोर्टाने आदेश दिल्यानंतर अनेक शहरात त्याचा परिणामही दिसून आला. दोन दिवसांपूर्वीच सर्व पालिकांनी शहरातील होर्डिंग आणि पोस्टर काढून टाकण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.
संबंधित पालिकेनी त्यानंतर सर्वच होर्डिंग,पोस्टर काढून टाकले. मात्र दुसऱ्याच दिवशी राजकीय पक्षाला कोर्टाच्या आदेशाचा विसर पडल्याचं दिसून आलं...
ठाण्यात मानपाड या पूलाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले होते.. यामध्ये आघाडीच्या नेत्यांचे होर्डिंग होते... यावर विचारणा केली असता चाचपडत आम्ही सर्वच कोर्टाचा निर्णयाचा स्वागत करतो अशी प्रतिक्रिया दिली... त्यामुळे ठाण्यातील नेत्यांचे चमकोगिरी अजूनही सुरूच आहे.
First Published: Sunday, March 17, 2013, 00:02