Last Updated: Friday, October 11, 2013, 09:42
www.24taas.com , झी मीडिया ठाणेठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीची निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गणेश साळवी यांनी राजीनामा दिला. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ही निवडणुकीची सेनेची खेळी असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान भाजपचे संजय वाघुलेही अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या या खेळीमुळे आघाडीपुढे पेच निर्माण झाल्याचं मानलं जातंय. स्थायी समितीत महायुतीचे ८ तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे ८ सदस्य आहेत. मात्र साळवी यांच्या राजीनाम्यामुळे आघाडी अडचणीत आली आहे.
युतीकडून बसपाचे विलास कांबळे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या संजय वागुले यांनी बंडखोरी करत फॉर्म भरला होता. तर दुसरीकडे आघाडीनं संजय भोईर यांना उमेदवारी दिलीय,परंतु मनसेचे सुधाकर चव्हाण यांनी तठस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने आघाडीत चिंतेचं वातावरण आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, October 11, 2013, 09:41