टीएमसीत परिवहन समिती निवडणुकीत आघाडीची बाजीTMC transport Committee election, Shiv Sena-BJP against

टीएमसीत परिवहन समिती निवडणुकीत आघाडीची बाजी

टीएमसीत परिवहन समिती निवडणुकीत आघाडीची बाजी
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

ठाणे महानगरपालिका परिवहन समिती निवडणुकीत आघाडीनं बाजी मारलीय. भाजपचे सदस्य अजय जोशी यांना आपल्या बाजूनं वळवण्यात आघाडीला यश आलंय. त्यांनी आघाडीला मत दिलंय.

शिवसेनेचे बंडखोर शैलेश भगत सभापतीपदी निवडून आलेत. दरम्यान अजय जोशी फुटल्यानं महापालिकेत शिवसेना-भाजप सदस्यांमध्ये मोठी खडाजंगी झाली. उपमहापौर मिलींद पाटणकर यांच्या केबीनची तोडफोड करण्यात आली. शैलेश भगत यांचा अर्ज भरतानाही आघाडी आणि शिवसेना सदस्यांमध्ये हाणामारी झाली होती.

भगत यांच्या बंडखोरीनं बुधवारी ठाणे महापालिकेच्या आवारात राजकीय हाणामारीही झाली होती. त्यामुळं आज होणारी निवडणूक गाजणार हे निश्चित आहे.. आज सकाळी साडे दहा वाजता ही निवडणूक होणार असून याकरिता महापालिका मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 23, 2013, 12:23


comments powered by Disqus