Last Updated: Tuesday, June 18, 2013, 10:07
www.24taas.com, ठाणे खोपोलीमधल्या झेनिथ धबधब्यात दोन पर्यटक बुडालेत. श्रीकांत पवार आणि जयेन्द्र बोराडे अशी त्यांची नावं आहेत. हे दोघेही बदलापूरचे रहिवासी होते.
रविवारी बदलापूरमधला सात जणांचा ग्रुप खोपोलीतल्या झेनिथ धबधब्यावर आला होता. मात्र, दुपारनंतर पावसाचा आणि धबधब्याचा प्रवाह वाढला. पाण्याचा लोंढा वाढल्याचं लक्षात न आल्यानं हे सातही जण पाण्यात वाहून चालले होते. त्यातील श्रीकांत पवार (४५ वर्ष) आणि जयेन्द्र बोराडे (३५ वर्ष) हे दोघे पाताळगंगा नदीत वाहून गेले. खोपोली पोलीस आणि अग्निशमन दल रात्रभर या दोघांचा शोध घेत होतं. अखेर सोमवारी दुपारी श्रीकांतचा मृतदेह शिळफाटा आणि जयेन्द्रचा मृतदेह रहाटावडे इथं आढळले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 18, 2013, 10:07