जुन्या वर्सोवा ब्रिजला तडे, दोन महिने वाहतूक बंद, Versova Bridge two months Close

अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील वर्सोवा ब्रिज वाहतूक दोन महिने बंद

अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील वर्सोवा ब्रिज वाहतूक दोन महिने  बंद
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वरील फाउनटन हॉटेलच्या पुढील जुन्या वर्सोवा ब्रिजला २१ डिसेंबरला तडे गेल्याने या महामार्गावरील गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतुकीची लेन उद्या सकाळपासून दोन महिन्यासाठी बंद करण्यात येणार आहे.

२२ डिसेंबरला दिल्लीहून हायवे ऑथरीटीची एक टीम आली होती. त्यांनी या पूलाची पाहाणी केली होती. त्यांनी आज हा निर्णय दिला आहे. हा पूल धोकादायक असून, त्याची तात्काळ दुरुस्तीचे काम करावे, असे या ऑथरीटीच्या टिमने सुचवले आहे. त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अनिल कुंभारे यांनी वर्सोवा जुना ब्रीजची वाहतूक दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या लेन वरून आता हलक्या गाड्यांची वाहतुक होणार आहे. तर अवजड वाहनास या पूलावरून बंदी केली आहे. तर शेजारील नव्याने बांधण्यात आलेल्या वर्सोवा ब्रीजला दुहेरी वाहतुक सुरू करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक संग्रामसिंग निशाणदार अवजड वाहनधारकांस विनंती केली आहे. की, दोन महिन्यासाठी ठाणेहून येणारी अवजड वाहने ही अंजूर-कामण मार्गे हलवण्यात येणार आहेत.

तसेच गुजरातहून येणारी अवजड वाहनं मनोर-वाडा, कामण-चिंचोटी मार्गे हलवण्यात येणार आहेत. तर मुंबईहून येणारी अवजड वाहने ही ठाणे मार्गे वळवण्यात येणार असल्याची माहिती दिली. सध्या वसई ते घोडबंदर रस्त्यापर्यंत वाहतूक कोंडी सुरू आहे. तर डहाणूच्या मस्तान नाक्यावरही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 25, 2013, 12:25


comments powered by Disqus