war of credit for Thane bridge-24taas.com

ठाण्याचा पुलावरून श्रेयाची लढाई

ठाण्याचा पुलावरून श्रेयाची लढाई

www.24taas.com, ठाणे

ठाण्यात फ्लॅटफॉर्म नंबर 10 वरच्या पुलाच्या श्रेयवादाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवासेनेत लढाई रंगली आहे. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज पुलाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला.

या पुलाचं उद्घाटन 15 ऑगस्टला पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते होणार होतं. मात्र विलासराव देशमुख यांच्या निधनामुळं उद्धाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. आता हा कार्यक्रम उद्या होणार आहे. उद्घाटन करण्यासाठी आलेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिका-यांची भेट घेतली.

पुलाचं त्वरीत उद्घाटन करुन तो लोकांना वापरण्यासाठी द्यावा अशी मागणी प्रवासांनी केली आहे. उद्धाटनाचा कार्यक्रम राजकीय पक्षांनी उरकला नाही तर प्रवाशांनाचं उद्घाटन करावे लागेल असा इशाराही प्रवाशांनी दिलाय.

First Published: Friday, August 17, 2012, 15:40


comments powered by Disqus