अनैतिक संबंधातून पत्नीने केले पतीचे ११ तुकडे Wife kills husband

अनैतिक संबंधातून पत्नीने केले पतीचे ११ तुकडे

अनैतिक संबंधातून पत्नीने केले पतीचे ११ तुकडे
www.24taas.com, कल्याण

अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीनं पतीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आलाय. या महिलेचा पती मथर धूर याचा 11 तुकडे केलेला मृतदेह पोलिसांना सापडला होता. आतिया धूर असं या महिलेचं नाव असून, तिचे तिचा दीर परवेझ धूर याच्याशी प्रेमसंबंध होते.

आरोपी परवेझ धूर हा ठाणे वाहतूक पोलिसांत वार्डन या पदावर कार्यरत होता. मृत मथूर धूर हा दूध व्यावसायिक होता. आतिया आणि परवेझ यांचा मथरच्या संपत्तीवर डोळा होता. यातूनच परवेझ आणि त्याच्या साथीदारांनी मथरची हत्या केली, त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे 11 तुक़डे करुन ते एका पोत्यात भरले आणि त्यांनी हे पोतं टिटवाळा ब्रिजपाशी टाकून दिले होते.

सुरुवातीला या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना बरेच कष्ट करावे लागले. मथर बेपत्ता असल्याची तक्रार कल्याणच्या बारापेठ पोलीस ठाण्यात दिली होती, त्यावरुन या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत या संपूर्म प्रकरणाचा उलगडा झाला.

First Published: Monday, December 17, 2012, 23:30


comments powered by Disqus