`त्या` कामाला नकार दिल्यानं तिच्यावर अमानुष अत्याचारWoman brutalised for refusing to enter flesh-tra

`त्या` कामाला नकार दिल्यानं तिच्यावर अमानुष अत्याचार

`त्या` कामाला नकार दिल्यानं तिच्यावर अमानुष अत्याचार
www.24taas.com, वृत्तसंस्था, ठाणे

अतिशय अमानुष अशी घटना भिवंडीत घडलीय. वेश्याव्यवसाय करण्यास नकार दिल्यानं तरूणीवर अमानुष कृत्य करण्यात आलंय. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केलीय. तर दोघं फरार झालेत.

रुबिना मुसी नावाची महिला भिवंडी परिसरात वेश्या व्यवसाय चालवला जात होता. तिचे आलम आणि अफजल हे दोन साथीदार होते.

वेश्याव्यवसायासाठी त्यानं एका २४ वर्षीय तरुणीला गुजरातहून विकत आणलं होतं. मात्र या तरूणीनं वेश्या व्यवसाय करण्यास नकार देत विरोध केला. तेव्हा तिन्ही आरोपींनी तिला मारहाण करुन तिच्यावर वेश्याव्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती केली.

परिसरातल्या एका महिलेच्या लक्षात ही बाब आल्यानंतर तिनं पोलिसांना त्याबाबत सांगितलं आणि पोलिसांनी रुबिना मुसीला अटक केली. तिचे दोन साथीदार आलम आणि अफजल फरार झालेत. तर पीडित तरुणीची प्रकृती गंभीर आहे. पीडित जबाब देण्याच्या परिस्थितीत नसल्यानं तपासात अडचणी येत आहेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 23, 2014, 13:54


comments powered by Disqus