Last Updated: Tuesday, June 4, 2013, 07:50
www.24taas.comसूर्यकिरणांचे अनन्य साधारण महत्त्व हे मानवी जीवनात आहे. त्यामुळेच वास्तूशास्त्रात देखील सूर्यकिरणांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. वास्तूशास्त्रात पाण्याचे टँक पुर्व किंवा उत्तर दिशेला विशेषता ईशान्य दिशेला खोदणे सर्वात चांगले मानले जाते. कारण त्यामुळे सुर्याची किरणे पाण्याच्या तळापर्यंत पोहचतील व जीवजंतूंचा नाश करून पाणी स्वच्छ होऊन पाण्यात उर्जा परावर्तीत करतात
काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी सूर्याच्या किरणांपासून मिळणारी उष्णता व त्यांच्या रंगाच्या बाबतीत संशोधन केले. पण आपल्या ऋषीमुनींनी मात्र कोणत्याही उपकरणांच्या मदतीशिवाय सुर्याचे रंग, ऊर्जा व त्याची उष्णता यांचा शोध तर लावलाच पण त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांना नावे पण ठेवली.
जयन्त, पर्जयन्त, आदित्य, भुज, सत्य, महेन्द्र, अग्नि ही नावे म्हणजेच आपले सप्तरंगच आहेत. झाडे प्राणवायु तर निर्माण करतातच पण अन्नही तयार करतात. वनस्पतीत असणारी हरीतद्रव्ये सुर्याच्या प्रकाशाच्या मदतीने स्वत:चे अन्नही तयार करतात.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 4, 2013, 07:47