`आप`चे आमदार अडचणीत, विनयभंगाचा गुन्हा, AAP MLA dharmendrasinga coli molestation

`आप`चे आमदार अडचणीत, विनयभंगाचा गुन्हा

`आप`चे आमदार अडचणीत, विनयभंगाचा गुन्हा
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

एक वर्षभरात राजकीय जादू करीत दिल्लीत आपले अस्तित्व दाखवून देशात चर्चेत राहणाऱ्या आम आदमी पार्टी अर्थात आपने अनेकांना चिंतन करायला लावले. याच आपचे नवनिर्वाचित आमदार धर्मेंद्रसिंग कोली यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आपचे आमदार अडचणीत आलेय.

सीमापुरी मतदारसंघाचे आपचे नवनिर्वाचित आमदार धर्मेंद्रसिंग कोली यांच्याविरुद्ध काँग्रेसचे पराभूत उमेदवार वीरसिंग धिंगान यांच्या पत्नीने विनयभंगाचा आरोप केला आहे. सोमवारी रात्री उशिरा याप्रकरणी कोलींविरुद्ध विनयभंग आणि दंगा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

कोली आणि आपचे नेते आणि आमदार अरविंद केजरीवाल यांनी आरोपांचा इन्कार केला आहे. हे प्रकरण खोटे असल्याचा दावा केला आहे. पक्षाला आणि पक्षाच्या उमेदवारांना बदनाम करण्याचा हा काँग्रेसचा कट असल्याचे आपने म्हटले आहे.

धिंगान यांना पराभूत करून धर्मेंद्रसिंग कोली मोठय़ा फरकाने बाजी मारली. सोमवारी सकाळी आपच्या कार्यकर्त्यांनी कोली यांची विजयी मिरवणूक काढली होती. मिरवणूक काँग्रेस उमेदवार वीरसिंग धिंगान यांच्या घरासमोर येताच आपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून विजयी नारेबाजी सुरू केली. यावरून आप आणि धिंगान यांच्या सर्मथकांमध्ये संघर्ष उडाला. याची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 11, 2013, 10:02


comments powered by Disqus