‘आप’च्या धक्क्यानं शीला दीक्षितांचा राजीनामा!Delhi polls: Sheila Dikshit regines, Congress accepts d

‘आप’च्या धक्क्यानं शीला दीक्षितांचा राजीनामा!

‘आप’च्या धक्क्यानं शीला दीक्षितांचा राजीनामा!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

चार राज्यांच्या मतमोजणीद्वारे धक्कादायक निकाल पुढे आले आहेत. अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं दिल्लीत जोरदार मुसंडी मारलीय. आपच्या झाडूनं काँग्रेसचा जणू सफायाच केलाय. त्यामुळं आपला पराभव स्वीकारत दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी राजीनामा दिलाय. उप-राज्यपाल नजीम जंग यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवलाय.

अखेर दिल्लीतून १५ वर्षांनंतर काँग्रेसला सत्ता गमवावी लागलीय. तर वैय्यक्तीकरित्या शीला दीक्षित यांनाही पराभवाचा झटका मिळण्याची शक्यता दृढ झालीय. कारण आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल मतांच्या संख्येत शीला दीक्षितांच्या पुढं निघाले आहेत.

दिल्लीत पूर्ण ७० जागांचा कल स्पष्ट झालाय. काँग्रेसची तिसऱ्या स्थानावर पिछेहाट झालीय. भाजप ३३ जागांवर पुढं आहे. तर आम आदमी पक्ष २६ जागांवर पुढं आहे. काँग्रेस मात्र केवळ ८ जागांवर पुढं आहे. तर तीन जागांवर इतर पक्ष पुढं आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 8, 2013, 12:07


comments powered by Disqus