Last Updated: Tuesday, December 10, 2013, 12:50
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीजनलोकपालच्या मुद्द्यावर भाजपने पाठींबा दिला तर दिल्लीत सरकार स्थापनेसाठी आम आदमी पार्टी भाजपला पाठींबा देईल, या प्रशांत भूषण यांच्या विधानावर खळबळ माजली होती. मात्र या प्रशांत भूषण यांनी आज हे विधान फेटाळलंय.
आम आदमी पार्टीच्याच मुद्द्यांनुसार भाजप प्रत्यक्षात वागायला लागली, तर वेगळ्या आम आदमी पार्टीची गरजच भासणार नाही असं प्रशांत भूषण यांनी म्हटलंय.
तर जनलोकपाल, प्रशासनातली पारदर्शकता यावर भाजप आपच्याही आधापासून आग्रही असल्याचं डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 10, 2013, 12:50