भाजपचा विजय... शेअर बाजारात विजयोत्सव!Sensex hits new record high of 21,483.74; Nifty crosses 6,400

भाजपचा विजय... शेअर बाजारात विजयोत्सव!

भाजपचा विजय... शेअर बाजारात विजयोत्सव!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

चार राज्यातल्या निवडणूक निकालांनंतर शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. सेन्सेक्सनं पहिल्या सत्राची सुरूवात तब्बल ४५० अंशांची उसळी घेत केली. सेन्सेक्सनं २१ हजारांचा टप्पा पार केला.

तर निफ्टीनंही १५० अंशांनी उसळी घेत जोरदार सुरूवात केली. निफ्टी ६४०० अंशांच्या टप्प्यात पोहोचला. गेल्या पार वर्षातली निफ्टीची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या चार राज्यांच्या मतमोजणीआधी झालेल्या एक्झिट पोलच्या भाकितानंतर सेन्सेक्सनं ४०० अंकांची उसळी घेतली होती. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपची सरशी झाली आहे. हे पाहाता आज शेअर बाजारचा निर्देशांक मोठा उच्चांक गाठण्याची शक्यता व्यक्त होती.

त्यानुसार आज बाजार उघडताच चांगलीच तेजी दिसली. त्यामुळं भाजपच्या विजयाचा सरळ-सरळ परिणाम शेअर बाजारात पडल्याचं चित्र आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 9, 2013, 11:26


comments powered by Disqus