अजितदादांच्या बेताल वक्तव्याचे विधिमंडळात पडसाद, Ajit Pawar debate on the issue of discordant conversation

अजितदादांच्या बेताल वक्तव्याचे विधिमंडळात पडसाद

अजितदादांच्या बेताल वक्तव्याचे विधिमंडळात पडसाद
www.24taas.com,मुंबई

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बेताल वक्तव्याचे तीव्र पडसाद विधिमंडळातही उमटले आहेत. विरोधकांनी आक्रमक होत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. माफी नको राजीनामाच हवा अशी ठाम भूमिका घेत विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळं विधिमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.

विरोधकांनी आज सकाळपासूनच अजित पवारांच्या बेताल वक्तव्याचा समाचार घेतला. अजित पवारांनी दोन्ही सभागृहांत माफी मागितल्यानंतरही विरोधकांचा आक्रमकपणा कमी झाला नाही. अखेर विरोधकांनी राजीमान्याची मागणी करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही घेराव घातला. त्यामुळं अजित पवारांच्या अच़डणी वाढल्या आहेत.

विरोधी पक्षांच्या आमदारांनी जोरदार हरकत घेतलीय. आक्रमक विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार गोधळ घातला. माफीनामा नको, राजीनामा द्या, अशी मागणी विरोधकांनी केली. अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. दोन वेळा अजित पावारंनी मागितलेल्या माफीनंतरही विरोधकांचे समाधान झालेलं नाही. दोन वाजेपर्यंत विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आले होते.

दरम्यान, अजित पवारांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी तर नाशकात शिवसेनेनं जोडेमारो आंदोलन केलं. विधिमंडळाच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

भाजप नेत्या शायना एनसी आणि माजी खासदार जयंतीबेन मेहता यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. नाशिकच्या शालिमार चौकात शिवसैनिकांनी अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. अजित पवारांनी राजीनामा द्यावी, अशी मागणीही शिवसैनिकांनी केली.

First Published: Monday, April 8, 2013, 16:17


comments powered by Disqus