दुष्काळग्रस्तांच्या समस्येवर तोडगा निघू शकेल?, budget in assembly

दुष्काळग्रस्तांच्या समस्येवर तोडगा निघू शकेल?

दुष्काळग्रस्तांच्या समस्येवर तोडगा निघू शकेल?
www.24taas.com, मुंबई

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालंय. दुष्काळानं होरपळलेल्या जनतेचे, शेती करपून गेलेल्या शेतकऱ्यांसह अनेकांचे डोळे लागलेत ते याच अधिवेशनाकडे...

सहा आठवडे चालणारं हे अधिवेशन १८ एप्रिलपर्यंत सुरू राहील. २० मार्च रोजी राज्याचा २०१३-१४ चा अर्थसंकल्प सादर केला जाईल. राज्यसरकार दुष्काळग्रस्त गावांना पाणी उपलब्ध करून देऊ शकेल का? जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल का? दुष्काळाचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटतील का? सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात साधक-बाधक चर्चा होऊ शकेल का? की विधानसभेचं हेही अधिवेशन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीतच संपणार?

काय वाटतंय तुम्हाला? काय सांगाल सरकारला? मांडा तुमचं रोखठोक मत.... तुमचं म्हणणं ‘झी २४ तास’पर्यंत पोहचण्यासाठी खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या प्रतिक्रिया...

First Published: Tuesday, March 12, 2013, 17:08


comments powered by Disqus