विधानभवनातील सीसीटीव्ही बिनकामाचे..., IN VIDHANBHAVAN CCTV CAMERA`S NOT WORKING PROPERLY

विधानभवनातील सीसीटीव्ही बिनकामाचे...

विधानभवनातील सीसीटीव्ही बिनकामाचे...
www.24taas.com, मुंबई

सचिन सूर्यवंशी मारहाण प्रकरणात विधान भवनातील सीसीटीव्ही कॅमेरात या मारहाणीचं स्पष्ट रेकॉर्डिंग झालीच नसल्याची माहिती आता पुढे आल्यानंतर आता चर्चा सुरू झालीय विधानभवनातील सीसीटीव्हींची... विधानभवनातील सध्याच्या २८ कॅमेऱ्यांबरोबरच (अत्याधुनिक नसलेल्या) आता आणखी १०० ‘अत्याधुनिक’ सीसीटीव्ही बसवण्याच्या प्रस्तावाला गती मिळतेय.

संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विधानभवात याआधी २८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, विधानभवनात आमदारांकडून पोलिस अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हे सीसीटीव्ही कॅमेरे बिनकामाची असल्याची कबुली दिलीय. त्यामुळे आता आणखी १०० ‘अत्याधुनिक’कॅमेरे बसवण्यात येण्याचा प्रस्ताव पुढे आलाय.

‘विधानभवनात २८ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून विधानभवनातील सर्व परिसरावर नजर ठेवता येत नाही. पोलीस अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा प्रकार आम्ही फूटेजमध्ये पाहिला, मात्र त्यात काहीच स्पष्ट दिसत नाही’असं गृहमंत्री पाटील यांनी म्हटलंय.

First Published: Saturday, March 30, 2013, 09:32


comments powered by Disqus