राज्याचे बजेट : पहा काय झालं महाग, State budget what is hike

राज्याचे बजेट : पहा काय झालं महाग

राज्याचे बजेट : पहा काय झालं महाग
www.24taas.com, मुंबई

२०१३-१४ या वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळात सादर केला आहे. राज्यावर असलेलं कर्ज, दुष्काळी परिस्थिती औद्योगिक विकास दर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांनी चांगलाच समतोल राखला आहे.

पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणाही अर्थसंकल्पात केलेल्या आहेत. या अर्थसंकल्पात ह्या गोष्टी महाग होणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.



काय झालं महाग

- ऊस खरेदी कर ३ वरून ५ टक्के

- साखर महागणार

- मद्यावरील निर्यात शुल्क वाढविले

- मद्य निर्यात करात वाढ होणार

- सिगारेट आणि विडी महागणार

- तंबाखूवर साडे बारा टक्के कर लावणार

- गुटखा विक्रिवर बंदी

- सोने, चांदी, हिरे महागणार

- सोने, चांदी, हिरे दागिन्यांवर १.१० टक्के कर प्रस्तावित

- सौदर्यं प्रसाधनांवर साडे बारा टक्के कर

- पेव्हर ब्लॉक्सवरील कराचा दर साडेबारा टक्के

- औद्योगिक कापड्यांच्या करात ५ टक्के वाढ

- साप्ताहिक लॉटरीवरील कर वाढणार


या गोष्टी महाग झाल्या आहेत. यात जास्तीत व्यसनाच्या जिन्नस या गोष्टींवरील कर वाढविण्यात आले आहे.

First Published: Wednesday, March 20, 2013, 15:23


comments powered by Disqus