अभिनेत्री ‘रेखा’च्या ब्युटी टिप्स!, Actress `line` of beauty tips!

अभिनेत्री ‘रेखा’च्या ब्युटी टिप्स!

अभिनेत्री ‘रेखा’च्या ब्युटी टिप्स!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूड जगातील एकेकाळच्या सुपरस्टार सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी पन्नाशी ओलांडली तरी देखील त्यांच्याकडे बघून ते मुळीच वाटत नाही. तजेलदार त्वचा, तोच मादक आवाज आणि तीच फिट अॅण्ड फाईन ‘फिगर’ हे तिचं वैशिष्ट्य. तिच्या या ब्युटी सिक्रेटबद्दल टिप्स जाणून घ्या स्वत: रेखाजींकडून तर मग काय आहे रेखाजींच्या ब्युटीचं रहस्य जाणून घेऊया...

• दिवसभरात १० ते १२ ग्लास पाणी पिते.

• रात्री लवकर झोपते आणि सकाळी लवकर उठते.

• सकस आहार घेते. जंक फूड, तळलेले पदार्थ, अति शिजलेले पदार्थ खाणे टाळते.

• तसेच मला ऑईल बेस मेकअप करायला आवडतो.

• त्वचा तजेलदार दिसण्यासाठी नियमित क्लिन्झिंग, मॉयश्चवरायझिंग करते.

• मी रोज १५ ते २० मिनिटे व्यायाम करते. योगा, मेडिटेशन करते.

• नृत्याच्या आवडीमुळे अर्धा तास रोज तालीम करते.

• रोजच्या जेवणात भाजी, दही, चपाती, डाळ, भात सॅलेड हवेच.

• संध्याकाळी ७.३०च्या आत जेवते. रात्रीच्या जेवणात एक बाऊल मोड आलेली कडधान्य खाते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, December 21, 2013, 14:26


comments powered by Disqus