Last Updated: Sunday, August 11, 2013, 15:51
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये वाढत असल्याचं एका सर्व्हेक्षणात दिसून आलंय. टेक्सास विद्यापीठातील एम. डी. अँडरसन कॅन्सर सेंटरनं हा सर्व्हे केला. अडीच हजारांहून अधिक केसेस त्यासाठी तपासण्यात आल्या.
ब्रेस्ट कॅन्सर जास्त प्रमाणात महिलांमध्येच होत असला, तरी पुरुषांमध्येही याचं प्रमाण वाढलंय. हा रोग होण्याची शक्यता गेल्या २५ वर्षांत एक लाख पुरुषांमागे ०.८६ टक्क्यांवरून १.०८ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. अभ्यासासाठी महिलांमधील ३ लाख ८० हजार विविध केसेस त्यासाठी तपासण्यात आल्या. पुरुषांनीही ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागरूक असावं, असं संशोधकांनी म्हटलं आहे.
पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता महिलांच्या तुलनेत उतारवयात वाढते. पुरुषांमध्ये ब्रेस्ट ट्युमर तपासणं अधिक सोपं असतं. `गिनेकोमास्टिआ`मुळं ब्रेस्ट ट्युमर वाढतो. पुरुषांना `इस्ट्रोजेन पॉझिटिव्ह ट्युमर`जास्त होऊ शकतो. त्यामुळं अशा पेशंटवर टॅमोत्सिफेन उपचार करणं शक्य असतं. महिला आणि पुरुषांमध्ये `सर्व्हाइव्हल रेट` मात्र सारखाच असतो.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, August 11, 2013, 15:51