Last Updated: Sunday, April 28, 2013, 17:06
www.24taas.com, मुंबईच्युइंग गम खाल्ल्यामुळे जाडेपणा वाढू शकतो. एका नव्या संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे. बहुतांश च्युइंग गममध्ये पुदिन्याची चव असते. अशी च्युइंग गम पाचक असतात. अशी च्युइंग गम खाल्ल्याने आपली भूक वाढत जाते. आणि अधिक आहारामुळे जाडेपणा येतो.
‘डेली मेल’ या ब्रिटिश वर्तमान पत्रात संशोधकांनी असा दावा केला आहे. यासाठी करण्यात आलेल्या संशोधनामध्ये संशोधकांना दिसलं, की च्युइंग गम चघळणारे लोक जास्त कॅलरी असणारे पदार्थ खाऊ लागतात. ओहिओ विश्वविद्यालयानेही या संदर्भात ‘लाइव्ह सायंस’ या वेबसाइटवर माहिती दिली आहे.
मिंट असलेल्या पदार्थांमुळे शरीरात रासायनिक अभिक्रिया सुरू होतात. कधी सकाळी दात घासल्यानंतर संत्र्याचा रस प्यायल्यास त्याची चव खराब लागते. यामागेही हिच रासायनिक अभिक्रिया कार्य करते. अशा प्रकारच्या क्रियेमुळे शरीराच्या वजनावर परिणाम होऊ शकतो.
First Published: Sunday, April 28, 2013, 17:06