स्कीन कॅन्सरवर गुणकारी क्रीम! cream on Skin cancer

स्कीन कॅन्सरवर गुणकारी क्रीम!

स्कीन कॅन्सरवर गुणकारी क्रीम!
www.24taas.com, मेलबोर्न

कर्करोग हा रोग इतका भयानक आहे की त्याचा विचार केला तरी नकोसे वाटते. कारण या रोगापासून सहजा सहजी सुटका होत नाही. रोग्यांना याचा त्रासही सोसावा लागतो. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातलाच एक म्हणजे त्वचेचा कर्करोग अर्थात स्कीन कॅन्सर.

ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी एक असं रसायन विकसीत केलंय, की जे मेलानोमा नावाच्या स्कीन कॅन्सरचा मुळापासून नाश करतं. शोध लावलेल्या नव्या रसायनबद्दल शास्त्रज्ञांना अशी अपेक्षा आहे की, बायोमेडिकल इंजिनिअरर्सच्या या सफलतमुळे भविष्यात स्कीन कॅन्सरवर उपाय म्हणून क्रीम तयार केली जाऊ शकते.

मेलबर्नमधील आरएमआईटी यूनिवर्टीतील संशोधकांनी म्हटले की शोधून काढलेल्या रसायनामुळे सामान्य त्वचेच्या पेशींचं कुठल्याही प्रकारचं नुकसान करत नाही. ते केवळ कॅन्सरशी संबंधित पेशींचा नाश करतं. यामुळे त्वचेचा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. क्रीमच्या रुपातील या रसायनामुळे कॅन्सर नष्ट झाल्यास कॅन्सरशी चालू असलेली लढाई सोपी होईल, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.

शोधकर्ता डॉक्टर टी इस्टीवॉन यांचं असं म्हणणं आहे की, या क्रीममुळे मेलानोमा नावाच्या त्वचेच्या कर्करोगावर प्राथमिक उपचार यशस्वी होतील. त्यांनी असेही म्हटले की प्रयोग केलेलं क्रीम कॅन्सरग्रस्त पेशींच्या विरुध्द क्रियाशील होतं, मात्र सामान्य पेशींना यामुळे कुठलीही हानी पोहोचत नाही.

First Published: Monday, October 8, 2012, 16:54


comments powered by Disqus