व्यायाम करा पाण्यात, ताकद येईल शरीरात Excercise in Water

व्यायाम करा पाण्यात, ताकद येईल शरीरात

व्यायाम करा पाण्यात,  ताकद येईल शरीरात
www.24taas.com, टोरंटो

जमिनीवर कार्डिओ व्यायाम करून जेवढा शरीराला फायदा दिसून येतो.त्याहून जास्त फायदा पाण्यात व्यायाम केल्यामुळे होतो. नुकत्याच एका संशोधनातून असं लक्षात आलं की स्वीमिंग टँकमध्ये इग्रोसायकल चालवल्यास जमिनीवर सायकलिंग केल्यामुळे होणाऱ्या फायद्यांपेक्षा अधिक होतात.

मांट्रियल हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक मार्टिन जुनेयू म्हणाले, की जमिनीवर व्यायाम करून तुम्हाला फायदा जाणवत नसल्यास पाण्यात व्यायाम करा. पाण्याच्या कंपनामुळे, प्रवाहामुळे शरीराला अधिक फायदा मिळत असतो.

मार्टिन म्हणाले, की पाण्यात व्यायाम केल्यामुळे शरीराला पुरेसा फायदा होणार नाही. मात्र पाण्यामध्ये व्यायाम केल्यास त्याचा फायदा अधिक होतो. यामुळे शरीराला अधिक ताकद मिळते.

First Published: Thursday, November 1, 2012, 09:24


comments powered by Disqus