सावधान!काही महिला विकत आहेत फेसबुकवर आपलं दूध Mothers selling their breast milk on Facebook!

सावधान!काही महिला विकत आहेत फेसबुकवर आपलं दूध

सावधान!काही महिला विकत आहेत फेसबुकवर आपलं दूध
www.24taas.com, लंडन

फेसबुकसारख्या साइट्स या फक्त अनोळखी लोकांशी मैत्री करण्यापुरता असतं, असा तुमचा समज असेल, तर तो खाटा आहे. कारण काही स्त्रिया आपलं दूध विकण्यासाठी फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करत आहेत. अशा प्रकारचं दूध विकलंही जात आहे. मात्र हे अत्यंत धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र अशा दुधाची खरेदी करणाऱ्यां जोडप्यांचं मात्र असं म्हणणं आहे की अशा प्रकारे अनोळखी महिलांचं विकत घेतलेलं दूध मुलांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरत आहे.

आजच्या दगदगीच्या दैनंदिन जीवनात शहरातील कित्येक महिला आपल्या मुलांना स्तनपान करवण्याऐवजी बाटलीतलं दूध पाजतात. अशा बालकांना दुसऱ्या स्त्रियांचं दूध पाजलं जाऊ शकतं. हे दूध विकतही मिळतं. यासंबंधी अनेक कायदे आहेत. मात्र फेसबुकवरून अनोळखी स्त्रियांचं दूध विकत घेणं अयोग्य असल्याचं म्हटलं जात आहे.

डेली मेल या वृत्तपत्राला एका वेबसाइटने सांगितलं, “आमच्याकडच्या सिस्टममध्ये स्त्रियांचं स्वचच्छ आणि शुद्ध दूध अत्यंत खासगीपद्धतीने विकत घेतलं जातं.” दूध विकाणाऱ्या स्त्रिया आपल्या शिशूच्या वयाबरोबरच आपल्या दुधाचंही रजिस्ट्रेशन करतात. विदेशात ठिकठिकाणी महिला आपलं ताजं किंवा फ्रिझ केलेलं दूध विकतात. इंग्लंडमध्ये याची किंमत १ पाउंड प्रति लिटर आहे, तर अमेरिकेत २ डॉलर्स इतकी आहे.

पण कुठल्याही प्रकारे सुरक्षिततेची खातरजमा नसलेलं मतृदुग्ध फेसबुकवरून विकणं हे अत्यंत धोकादायक आहे. हे दूध विकणाऱ्या स्त्रिया अमली पदार्थ सेवन करत नसतील, दारू-सिगरेटच्या व्यसनी नसतील किंवा त्यांना एड्ससारखा रोग नसेल याची काही खात्री नसते. अशा प्रकारे महिलांचं दूध विकत घेणं समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने धोक्याचं असल्याचं शिशू रोग विशेषज्ञ संस्थेचे अध्यक्ष वूल्फरॅम हार्टमन यांचं म्हणणं आहे.

First Published: Thursday, October 18, 2012, 16:31


comments powered by Disqus