वजन कमी करायचयं, तर पाहा भूताचे सिनेमे.. ,seem to have put on weight, see horror movie

वजन कमी करायचयं, तर पाहा भूताचे सिनेमे..

वजन कमी करायचयं, तर पाहा भूताचे सिनेमे..
www.24taas.com, लंडन

स्थूल व्यक्ती ह्या आपल्या वजनाविषयी फारच चिंतेंत असतात. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करीत असतात. वजन कमी करण्यासाठी आपण दररोज नवीन फंडे शोधत असतो. कधी चालायला जा कधी जिम तर कधी डाएट.

पण नुकत्याच झालेल्या संशोधनातून वजनशील व्यक्तींसाठी वजन कमी करण्याचा एक मनोरंजक उपाय समोर आला आहे. मॉर्निंग वॉकला जाऊन जितक्या कॅलरीज आपल्या शरीरातल्या कमी होतात तितक्याच कॅलरी आपण भूताचा चित्रपट बघूनही कमी करू शकतो. दीड

तासाच्या एका हॉरर मुव्हीमुळे आपल्या शरीरातील दोनशे कॅलरी कमी होतात. वेस्टमिन्स्टर युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका संशोधनातून हा निष्कर्ष समोर आला आहे.

खालील चित्रपट पाहिल्यावर घटलेल्या कॅलरी
1. द शायनिंग - १८४ कॅलरी
2. जॉज् - १६१ कॅलरी
3. द एक्झॉर्सिस्ट - १५८ कॅलरी
4. एलियन - १५२ कॅलरी
5. सॉ - १३३ कॅलरी
6. अ नाईटमेअर ऑन एल्म स्ट्रीट - ११८ कॅलरी
7. पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी - १११ कॅलरी
8. द ब्लेअर विच प्रोजेक्ट - १०५ कॅलरी
9. द टेक्सास चेन सॉ मॅसॅकर - १०२ कॅलरी
10. (आरईसी) - १०१ कॅलरी

First Published: Tuesday, October 30, 2012, 13:14


comments powered by Disqus