Last Updated: Tuesday, May 22, 2012, 11:22
www.24taas.com, वॉशिंग्टन रात्री झोपेत घोरणाऱ्यांना शांत झोप लागत नाही, हे तर सगळ्यांनाच माहित आहे. पण रात्री झोपेत घोरणाऱ्यांना कँसरचा धोका अधिक असतो, अशा शोध नुकत्याच एका अभ्यासातून समोर आलाय.
अमेरिकेतील विसकोंसिल युनिव्हर्सिटीच्या एका ग्रुपने आपल्या संशोधनातून काही मुद्दे प्रकाशात आणले आहेत. यात त्यांना जाणवलं की घोरण्यामुळे निद्रानाश, कँसर इ. आजारांची शक्यता वाढते. घोरणारे आणि श्वसनाचे विकार असणाऱे लोक कँसरने दगावण्याची शक्यता इतर लोकांहून ५ पट जास्त असते.
दैनिक टेलिग्राफनुसार शास्त्रज्ञांनी अभ्यासासाठी झोपेची समस्या असणाऱ्या १५२२ लोकांचे गेल्या २२ वर्षांतील रेकॉर्ड्स तपासले. या अभ्यासातून त्यांना दिसलं की ज्या लोकांना झोपेची थोडीशीच समस्या होती, त्यांच्यात इतरांपेक्षा कँसरचा धोका ०.१ पटीनेच वाढला होता. पण ज्यांना झोपेची समस्या जास्त होती, त्यांना कँसरचा धोका ४.८ पटीने वाढला होता. हे निष्कर्ष अमेरिकन थोरासिस सोसायटी इंटरनॅशनल काँफरन्समध्ये प्रस्तुत करण्यात आले आहेत.
First Published: Tuesday, May 22, 2012, 11:22