रोज दात न घासल्यास होऊ शकतो कँसर - Marathi News 24taas.com

रोज दात न घासल्यास होऊ शकतो कँसर

www.24taas.com
 
सकाळी उठल्यावर दात घासावे, हे मुलांना लहानपणी पालक सांगतात, दंतवैद्य सांगतात. पण, आता कँसर विशेषज्ञही हेच सांगू लागले आहेत. दात न घासल्यास दातांवर जी पुटं चढू लागतात, त्यामुळे कँसरचा धोका वाढतो.
 
स्वीडनच्या अभ्यासकांनी कँसरच्या पाच केसेसपैकी १ केस संक्रमण आणि सुज ही सांगितली आहे. दातांवरील अन्नाच्या पुटांमुळे हिरड्यांचा त्रास सुरू होतं. यामुळे दातांमध्ये विषाणू निर्माण होता आणि यातूनच कँसर होण्याची शक्यता वाढते. या शोधासाठी स्टॉकहोमच्या १३९० व्यक्तींच्या दातांचा अभ्यास करण्यात आला होता.

First Published: Wednesday, June 13, 2012, 15:16


comments powered by Disqus